Plane Crash Prediction : 5 जून रोजीच केली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अॅस्ट्रो शर्मिष्ठाची ‘ती’ पोस्ट व्हायरल

एअर इंडियाच्या आजच्या विमान अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या अपघातात विमानातील जवळजवळ सगळेच मृत पावल्याचे समजत आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 गुरुवारी (12 जून) दुपारी 1:39 वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. मागच्या वर्षी या अपघाताची भविष्यवाणी करण्यात आली होती ती आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
अॅस्ट्रो शर्मिष्ठाची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एक्सवर अॅस्ट्रो शर्मिष्ठा (Astro Sharmistha) नावाच्या हँडलवरून ही भविष्यवाणी आधी गेल्या वर्षी करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२४ रोजी २०२५ साठीची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यात तिने भारतीय हवाई क्षेत्राबाबतही भविष्यवाणी केली होती. यात एका मोठ्या विमान अपघाताची शक्यता असल्याचे म्हटले होते. तिच पोस्ट तिने पुन्हा ५ जूनला रिपोस्ट करत मी आजही विमान अपघाताची शक्यता असल्याचे सांगत असल्याचे म्हटले होते. यानंतर अवघ्या सात दिवसांनी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे. शर्मिष्ठाने गेल्यावर्षी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०२५ मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, तसेच विमान अपघातांच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, असे भाकीत दोन महिन्यांपूर्वी केले होते.
Aviation sector will do better in 2025, also plane crash headlines may give us shock, predicted this two months back, check the tweet below. Already a bit betterment in aviation sector started. When Jupiter will be in Gemini part of Mrigashira & Ardra with the speed of approx…
— Astro Sharmistha (@AstroSharmistha) December 29, 2024
5 जून रोजी काय केली होती भविष्यवाणी?
तिने टाटा आणि राफेल, इस्त्रो आदीबाबतही भविष्यवाणी केली आहे. टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहे. हा फक्त विमानचालन विस्तार आहे, येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. २०२५ मध्ये विमान अपघात आणि विमान वाहतुकीत विनाश होण्याची भविष्यवाणी मी अजूनही तशीच ठेवत आहे, अशी पोस्ट तिने ५ जूनला केली होती.
Tata will make Rafale fuselage in Hyderabad. This is just aviation expansion, ISRO will surprise the world in Space and satellite engineering, space tourism in coming two years. Predicted this last year via Nakshatra transit. I am still holding high the prediction of Plane crash… https://t.co/WjX39R7E47
— Astro Sharmistha (@AstroSharmistha) June 5, 2025
विमानातील प्रवासी आणि क्रू:
विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडियन नागरिक होते. क्रू मेंबर्समध्ये कॅप्टन सुमीत सभरवाल, फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन, दीपक पाठक, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा यांचा समावेश होता. अपर्णा महाडिक या तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत.
अपघाताचे स्वरूप:
प्रत्यक्षदर्शींनुसार, विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले, ज्यामुळे 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि परिसरात प्रचंड धूर आणि मलबा पसरला. फ्लायटरडार24 नुसार, विमान 625 फूट उंचीवर असताना त्याचा शेवटचा सिग्नल मिळाला. पायलटने मेडे कॉल दिला, परंतु विमानाला सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही.
बचावकार्य आणि सरकारी प्रतिसाद:
एनडीआरएफच्या सहा तुकड्या, बीएसएफ आणि दमकल विभाग घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. अहमदाबाद पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक 07925620359, तर एअर इंडियाने 18005691444 आणि नागरिक उड्डयन मंत्रालयाने 011-24610843, 9650391859 आणि 9974111327 हे क्रमांक जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी शोक व्यक्त केला. डीजीसीए आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांनी तपास सुरू केला आहे.





