#PKLSeason10 (#CHEvHS Match 41) : हरियाणा स्टीलर्सने केली पाचव्या विजयाची नोंद…

Pro Kabaddi League 2023-2024 : प्रो कबड्डी लीगच्या 41 व्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने तमिळ थलायवाज संघाचा ४२-२९ अशा फरकाने पराभव केला. स्टिलर्सचा हा या हंगामतील ५ वा विजय तर थलायवाजचा हा ५ वा पराभव ठरला.
स्टिलर्सकडून शिवम पटारे(८ गुण), जयदीप(७ गुण), राहुल सेथपाल(७ गुण) यांनी धडाकेबाज कामगिरी केली. तर थलायवाजकडून साहिल सिंगने १० तर हिमांशूने ९ गुणांची कमाई केली.
इसे कहते हैं देसी छोरों का धाकड़ खेल 💪
हरियाणा स्टीलर्स ने दर्ज की 5वीं जीत 🙌#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #CHEvHS #TamilThalaivas #HaryanaSteelers pic.twitter.com/EvoryHGi0D
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2023
दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या ४० व्या सामन्यात दबंग दिल्ली केसीने बंगाल वॉरियर्सचा ३८-२९ असा पराभव केला. दिल्लीचा ६ सामन्यांनंतरचा हा तिसरा विजय असून गुणतालिकेत ते ९व्या स्थानावर आले आहेत. बंगाल वॉरियर्सचा ८ सामन्यांनंतर तिसरा पराभव झाला असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.
दबंग दिल्लीसाठी या सामन्यात, नवीन कुमारने चढाईत सर्वाधिक ११ रेड पॉइंट घेतले आणि बचावात, आशिष आणि योगेश यांनी सुपर-५ टाकताना ६-६ टॅकल पॉइंट घेतले. बंगाल वॉरियर्ससाठी, नितीन कुमारने चढाईत ९ रेड पॉइंट घेतले आणि वैभव गर्जेने बचावात ४ टॅकल पॉइंट घेतले.





