पियुष गोयल यांनी मुंबईत कुटुंबासह केले मतदान

Piyush Goyal voted । लोकसभा निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 8 राज्यांतील 49 जागांवर सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे. दरम्यन, भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पीयूष गोयल यांनी कुटुंबासह मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.
पियुष गोयल यांनी मतदान केले Piyush Goyal voted ।
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पीयूष गोयल मतदान करण्यासाठी मुंबईतील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी आपल्या कुटूंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
“Everyone should take part in the festival of democracy” says BJP’s Mumbai North candidate Piyush Goyal after casting his vote
Read @ANI Story | https://t.co/Vvk4LW6rkD#PiyushGoyal #LokSabhaElection2024 #Mumbai pic.twitter.com/PREo2lq3uI
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2024
दुसरीकडे रायबरेलीचे भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनीही मतदान केले. दुसरीकडे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हेही मतदानासाठी कुटुंबासह मुंबईत पोहोचले.
राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच 13 लोकसभेच्या मतदानाने सांगता होणार आहे.





