Pimpri : माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीचे आज पूजन
Updated On:

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाला जुंपल्या जाणार्या मानाच्या बैलजोडीचा पूजन सोहळा आयोजित केला आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या बैलजोडीचे पूजन केले जाणार आहे. सोमवारी(दि.2) सकाळी अकरा वाजता माऊली मंदिराच्गया महाद्वारात हा सोहळा पार पडणार आहे.
आळंदी ग्रामस्थांचा सहभाग असलेल्या बैलजोडी समितीने आळंदी येथील रहिवासी अर्जुन मारुती घुंडरे व विवेक ज्ञानेश्वर घुंडरे यांच्या बलजोडीला यंदा माऊलींच्या पालखी रथाला जुंपण्याचा मान दिला आहे.
आषाढीवारीत माऊलींचा पालखी रथ ओढण्याचे काम ही बैलजोडी करणार आहे. उद्या होणार्या पुजन सोहळ्यापुवि या बैलजोडीची आळंदी परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे.





