Pimpri : आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये वर्ल्ड किडनी डे उत्साहात साजरा

पिंपरी : आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे वर्ल्ड किडनी डे निमित्त विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तुमच्या किडनी ठीक आहेत का? लवकर शोधा, किडनीचे आरोग्य जपा. या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामध्ये लवकर निदान, प्रतिबंध आणि दीर्घकालीन किडनी आरोग्यावर भर देण्यात आला.
यावेळी 250 हून अधिक मोफत क्रिएटिनिन चाचण्या करत, निष्ठावान रुग्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात अ ाली. विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर सत्रांच्या आयोजनात नेफ्रोलॉजी तज्ज्ञ डॉ. मनीषकुमार माळी, डॉ. तुषार वारके, डॉ. अदिती पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ पामेश गुप्ता, वैद्यकीय संचालक डॉ. भास्कर दत्ता, मनुष्यबळ विभागप्रमुख विजय गोळे, अर्थविभाग प्रमुख पंकज जैन उपस्थित होते.
यावेळी डॉ. मनीष माळी म्हणाले, क्रॉनिक किडनी डिसीज ही मूक साथ आहे आणि त्याचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित तपासणी, आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
सीईओ पामेश गुप्ता म्हणाले आमच्या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश केवळ उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देणे नाही, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा प्रसार करणे हा आहे. या वर्ल्ड किडनी डे उपक्रमाद्वारे आम्ही जनजागृती वाढवण्याचा आणि रुग्णांना त्यांच्या किडनी आरोग्याच्या प्रवासात मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.





