Pimpri : घटस्फोट देण्यासाठी पत्नीला मारहाण
Updated On:

दिघी : पत्नीने घटस्फोट द्यावा, तसेच तिने यापूर्वी केलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात यासाठी पती आणि त्याच्या मैत्रिणीने पत्नीला मारहाण केली. ही घटना १८ मार्च रोजी चऱ्होली येथे घडली.
याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत संभाजी काटे (वय ३१, रा. चऱ्होली), आणि ४२ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि त्याची मैत्रीण फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत घटस्फोट देण्याच्या कारणावरून तसेच जुन्या तक्रारी मागे घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.





