Pimpri : उद्योजकांच्या तक्रार निवारणासाठी वेबसाईट व ॲप

खालापूर : राज्याची प्रगती करायची असेल तर उद्योग वाढले पाहिजेत. त्यासाठी कारखानदारांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्यानुसार रायगड पोलिसांनी पुढाकार घेत कारखानदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी रायगड समाधान वेब व मोबाइल ॲप सुरू केले आहे. पातळगंगा येथील रिलायन्स कंपनीच्या आरटीजी हॉलमध्ये विशेष कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी महानगर गॅस उप व्यवस्थापकीय संचालक संजय शेंडे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांसह कंपनी व्यवस्थापक उपस्थित होते.
शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत, नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी भयमुक्त व पोषक वातावरण तयार करणे बाबत रायगड समाधान वेब व मोबाइल आधारित संगणक प्रणाली http://raigadsamadhan.in/ सुरू केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.





