Pimpri : दुचाकी घसरून सख्ख्या भावांचा मृत्यू
Updated On:

देहूरोड : चिंचवड येथून कामावरून दोन सख्खे भाऊ घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (15 एप्रिल) रात्री घडला.
योगेश राजोरिया (वय ३४), दीपक राजोरिया (वय ३१, दोघेही पारशीचाळ, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. योगेश आणि दीपक हे चिंचवड येथे काम करत होते. मंगळवारी रात्री ते कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते.
रस्त्यात अचानक दुचाकी घसरल्याने योगेश आणि दीपक रस्त्यावर पडले. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.





