Pimpri : दोन दुचाकींची धडक, एक जखमी

पिंपरी – आळंदी-मरकळ रोडवर एका अज्ञात दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे एक इसम जखमी झाला. अपघातानंतर धडक दिलेला दुचाकीस्वार घटनास्थळाहून पळून गेला. ही घटना सोमवारी दुपारी पावणे चार वाजता घडली.
या प्रकरणी अनिल मोतीराम पवार (वय ३२, रा. गोपाळपुरा, द्वारका हौसिंग सोसायटी, आळंदी ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात अॅक्िटव्हा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे बंधू हनुमंत पवार हे कामावरुन घरी जात असताना अक्षदा हाॅटेल, वाघेश्वर डेयरीजवळ आळंदी-मरकळ रोड येथे एका अज्ञात अॅक्िटवा चालकाने भरधाव वेगात दुचाकी चालवत हनुमंत पवार यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात हनुमंत पवार जखमी झाले. अपघातानंतर कोणासही माहिती न देता अथवा कोणतीही मदत न करता आरोपी पळून गेला. आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.





