पिंपरी – अखेर पावसाने शहराचा पिच्छा सोडला असून आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून अनेक दिवसांनंतर शहरातील किमान तापमान २० अंश सेल्ियसच्या खाली उतरले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात चांगलीच घसरण झाल्याची दिसून येत आहे. मे महिन्याच्या मध्यापासून अवकाळीने सुरु झालेला पावसाळा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होता आणि अवकाळीनेच पावसाळ्याने निरोप घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस थांबला पासून ढगाळ वातावरण देखील नाहीसे झाले आहे. यामुळे हिवाळा ॠतु सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने शनिवारी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत शहरात किमान तापमान १९ अंश तर कमाल तापमान ३१ अंश सेल्िसय इतके नोंदविले आहे. शहराच्या जवळच असलेल्या मावळ तालुक्यात देखील गुलाबी थंडी अवतरली असून तळेगाव दाभाडे येथे पारा १४. ८ अंशांपर्यंत खाली आला आहे. येत्या आठ दिवसांत पिंपरी-चिंचवड शहराचे किमान आणि कमाल तापमान १९ ते ३० अंशा दरम्यान राहणार असल्याचे आणि आकाश निरभ्र राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.