Pimpri : तळेगाव नगरीचा विकास अधिक गतीने करणार : आ. शेळके

तळेगाव दाभाडे : माझ्यावर विश्वास ठेऊन मावळच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने मला पुन्हा आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पुढील काळात तळेगाव दाभाडे नगरीचा विकास अधिक गतीने करणार असल्याचे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप मित्र परिवार व हरी ओम ग्रुप आयोजित आमदार सुनील शेळके यांचा भव्य नागरी सत्कार व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमप्रसंगी आमदार शेळके बोलत होते. यावेळी श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे, उद्योजक संग्राम जगताप, कल्याणी जगताप, सिने अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, गुरुवर्य हितेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, दर्शन खांडगे, अशोक भेगडे उपस्थित होते.
यावेळी संग्राम जगताप यांनी कष्ठमय जीवन जगत केलेल्या प्रगतीचे व सामाजिक कार्याचे शेळके यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले. तर प्रस्ताविक तळेगाव दाभाडे शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी केले. यावेळी झालेल्या न्यू होम मिनिस्टर स्पर्धेतील महाविजेत्या अनुजा पोतदार या ठरल्या.





