Pimpri : आदिवासी सेवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

पवन मावळ : पवन मावळ विभागातील तिकोणा, जवन नंबर १, २ व ३, आजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी (कोटमवाडी), चावसर, मोरवे, तुंग आणि कोळे चाफेसर या गावांतील आदिवासी नागरिकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले.
दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी महादेव मंदिर, शिळींब येथे आयोजित या अभियानामध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना घरकुल योजना, जातीचे दाखले, तसेच शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य करण्यात आले. अभियानाद्वारे शेकडो आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून आदिवासी ठाकर-कातकरी समाजासाठी ह्या विशेष सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि.१३) अभियानाची सांगता झाली. समारोपप्रसंगी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष किसन कडू, शिळीम ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धार्थ कडू, ग्रामस्थ उपस्थित होते.
अभियानातील प्रमुख निष्कर्ष
जातीचे दाखले वितरीत – १७४
घरकुल योजनेअंतर्गत अर्ज – ३७
रेशनकार्ड प्रक्रियेसाठी अर्ज – ७०
आभा कार्ड – २२





