Pimpri : मारुंजीतील सहा मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये गुरुवारी (दि.5) मारुंजी भागातील सर्वे नंबर 45/1/2 मधील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या सहा मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची दखल घेत अशा बांधकामावर थेट कारवाई सुरू आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रभारी महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन म्हस्के, पोलीस निरिक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आतापर्यंत 122 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात 967 अनाधिकृत होर्डिंग आढळून आल्या आहेत. गेल्या काही दिवसात 122 होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकामार्फत काढण्यात आल्या आहे. रहदारीस अडथळ तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा स्थितीतील हवेली, भोर, मुळशी, पुरंदर, दौंड आदी भागातील अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
मारुंजी : पीएमआरडीएच्या वतीने मारुंजी येथील सहा मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली.





