Pimpri : साठे, यादव, कांबळे यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’

नवी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या वतीने नवी मुंबई येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव (क्रिडा क्षेत्र), काळूराम लांडगे, नगरसेवक डॉ. विश्वास गजरमल, राहूल साळुंके (सामाजिक क्षेत्र), तसेच सुभाष माकर (शेती क्षेत्र) यांची निवड करण्यात आली होती.
सन्मानप्रदान सोहळा अभिनेते संभाजी माने व अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज घोरपडे, अमित गाडे पाटील, कुणाल मालुसरे, राजेंद्र मोहिते पाटील, सचिन भोसले, एपीआय विजय राऊत यांची उपस्थिती होती. या गौरवाने पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांचा सन्मान वाढविला असून छावा प्रतिष्ठानचे विशेष कौतुक होत आहे.





