Pimpri : सांगवीत पोलिसांचा रुट मार्च

पिंपळे गुरव : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थत्त राखण्यासाठी सांगवी पोलिसांनी पथ संचलन केले. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौक परिसरात रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान रामकृष्ण चौकात दंगा नियंत्रणाचा सराव करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, महाशिवरात्री होळी असे सण येत असल्याने जनतेच्या मनात विश्वास, सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे. तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १८) सकाळी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकातून रूट मार्च काढण्यात आला.
श्रीनगर कॉलनी, सह्याद्री कॉलनी, बॅडमिंटन हॉल, काटेपुरम चौक, काशी विश्वेश्वर चौक, पूजा हॉस्पिटल, बँक ऑफ महाराष्ट्र चौक, गांगार्डे नगर मार्गे रामकृष्ण मंगल कार्यालय येथे रूट मार्चचा शेवट करण्यात आला. रामकृष्ण चौकात तसेच सांगवी पोलीस स्टेशन येथे दंगा नियंत्रण सराव देखील करण्यात आला. यात ३ अधिकारी व २५ अंमलदार याप्रसंगी हजर होते.
यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे, उपनिरीक्षक रोहित पाटील तसेच सांगवी पोलीस स्टेशनचे २५ अंमलदार, रहाटणी अग्निशामक दलाचे वाहन, १० अग्निशामक दलाचे जवान याप्रसंगी हजर होते.





