Pimpri : वायसीएम रूग्णालय डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील अधिष्ठाता, अध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय वर्षे ५८ वरून वय वर्षे ६४ करण्यात आले आहे. त्याला शासन आदेशानुसार निवृत्तीचे वय वाढविण्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
शासन निर्णयानुसार वायसीएम रूग्णालयातील अधिष्ठाता, अध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय वर्षे ५८ वरून ६४ वर्षे करण्यात आले आहे.
तसेच, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार शरीररचनाशास्त्र शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील एम. एस्सी., पी.एचडी. हे अवैद्यकीय शिक्षण असलेल्या उमेदवारांना ५० टक्के पर्यंतच्या मर्यादेत अध्यापकीय पदांवर नियुक्त्या दिल्या जातात.
या विषयातील अध्यापकांना देखील सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६४ वर्षे असे करण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.





