Pimpri : शहरातील 10 हजार 820 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडला

पिंपरी : वीजबिल भरले नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत गेल्या 27 दिवसांमध्ये पुणे परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक 33 हजार 329 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यात पिंपरी चिंचवड शहरातील 10 हजार 820 थकबाकीदारांचा समावेश आहे. तर महावितरणने जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे परिमंडलामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांकडे अद्यापही 82 कोटी 97 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
त्यामुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 29), रविवारी (दि. 30) व सोमवारी (दि. 31) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.





