Pimpri : लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्याच पाहिजेत – आ. शेळके

मावळ : ‘जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले. आमदार शेळके यांचा जनता दरबार उपक्रम नागरिकांच्या प्रतिसादामुळे पुन्हा यशस्वी ठरला आहे.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात आमदार शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या.
यावेळी प्रथमच जनता दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यात, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे, किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्या ऐकून घेऊन तत्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे, हीच खरी जबाबदारी आहे. जनता दरबार उपक्रमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते.
– सुनील शेळके, आमदार, मावळ





