पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या १७ गावांचा हवेली येथील भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत समावेश आहे. त्यात गावे समाविष्ठ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यामधील काही त्रुटी दुरूस्ती करण्याची सूचना शासनाने केल्या आहेत. त्या त्रुटी दुरूस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर होइल. त्यानंतर नवीन गावे समाविष्ठ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेली १७ गावांचा सध्या हवेली येथील भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत समावेश आहे. पिंपरीतील कार्यालयात या गावांचा समावेश करण्याची अनेक वर्षांची विकसक, नागरिक, जमिनधारक यांची मागणी आहे. त्या मागणीवरून भूमी अभिलेख कार्यालयाने तसा प्रस्ताव शासनाच्या संबंधीत विभागाकडे पाठविला होता. प्रस्तावामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्या दुरूस्त करून देण्याची सूचना शासनाने भूमी अभिलेख कार्यालयाला केली आहे. १३ मार्च पर्यंत पुन्हा हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. अभिलेख कार्यालयामार्फत सुचविलेल्या दुरूस्ती करून प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर आठवडा किंवा दोन आठवड्याच्या आत शहरातील १७ गावांचाही पिंपरी कार्यालयांतर्गत समावेश होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची पुण्यात होणारे हेलपाटे थांबवणार आहेत. याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यातील त्रुटी दुरूस्ती करून देण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा प्रस्ताव पाठवू. – राजेंद्र गोळे, उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश.