चिंचवड – नवतरुण मंडळ चिंचवडगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर मधुकर चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने “खेळ रंगला पैठणीचा” हा महिलांसाठी खास कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गौरी गणपती सजावट स्पर्धा तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सचिन कोळूरे, हिमांशू बराटे, गौरव गुधाते व विद्या सदानंद यांनी पुरस्कार जिंकले. “खेळ रंगला पैठणीचा” या खेळात ज्योती कोल्हे, पूजा गरड आणि रेणुका ढगे विजयी ठरल्या. विजेत्या स्पर्धकांना टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीन, इस्त्री अशी बक्षीसे देण्यात आली. तसेच कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरलेल्या मानाच्या दोन पैठण्या लकी ड्रॉद्वारे कांचन सदाशिव हुशार व शालन भरत कोळी यांना प्रदान करण्यात आला. निवेदन अक्षय मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका डॉ . सुलक्षणा शिलवंत, उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,माजी नगरसेवक गणेश भोंडवे ,कार्याध्यक्ष संतोष कवडे , श्रीमंत जगताप, मनसे नेते हेमंत डांगे, माजी स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, उज्वला गावडे, अंबर चिंचवडे आणि रमेश वाळुंज उपस्थित होते. सागर चिंचवडे यांनी या प्रसंगी म्हणाले की, “महिला भगिनी समाजाचे बळ आहेत, त्यांची कला, संस्कार आणि उत्साह यांच्यामुळे समाज अधिक सुशोभित होतो. महिलांना प्रोत्साहन देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि अशा कार्यक्रमांद्वारे त्यांच्या योगदानाचा गौरव केला जातो.” कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि युवा वर्ग यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.