Pimpri : पडवळ, वायकर बैलगाड्यांनी पटकाविला किताब

कान्हे : कान्हे येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार-आमदार केसरी बैलगाडा स्पर्धेत १९१ गाड्या धावल्या. रविवारी (दि. २६) मावळ केसरी घाट या ठिकाणी या शर्यती संपन्न झाल्या.
या शर्यतीत खासदार-आमदार केसरी किताबाचा मान बंडा पडवळ व बाबुराव वायकर यांच्या गाडीने पटकाविला. ते बुलेट गाडीचे मानकरी ठरले. या स्पर्धेचे आयोजन गिरीष सातकर व कान्हे मावळ बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेत बुलेट, शाईन, डिलक्स, कुटी मशीन, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कूलर आदी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमधे एकूण १९१ गाडा मालकांनी सहभाग घेतला. सरपंच सचिन काजळे यांची गाडी दिवस भर घाटाचा राजा राहिली.
असा आहे स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक बंडा पडवळ व बाबुराव वायकर यांच्या गाडीचा आला. द्वितीय क्रमांक स्वप्नील तरस व आकाश तीकोने यांचा गाडीचा (शाईन गाडीचा मानकरी) तर तृतीय क्रमांक सुरेश गायकवाड व नामदेव कोंडे, तुषार कवडे व अमित गायकवाड यांचा गाडीचा आला (शाईन गाडीचा मानकरी). चतुर्थ क्रमांक सरपंच सचिन काजळे यांच्या गाडीचा तर पाचवा क्रमांक स्वामी गायकवाड व संतोष मांडेकर यांचा गाडीने मिळविला. हे दोन्ही क्रमांक एचएफ डिलक्स गाडीचा मानकरी ठरले. सहावा क्रमांक देवराम गायकवाड (वॉशिंग मशीन चे मानकरी) तर सातवा क्रमांक शिवण्या बालगुडे व सुनील गायकवाड यांचा आला (फ्रिज चे मानकरी).
आठवा राजाराम कुटे, श्रीरंग पडवळ व शिवन्या बालगुडे, नवनाथ पडवळ यांचा गाडीचा आला (वॉशिंग मशीनचे मानकरी). तसचे नववा क्रमांक दत्ता साबळे यांचा गाडी चा आला (टीव्हीचे मानकरी), दहावा क्रमांक सोमनाथ लालगुडे व किरण लालगुडे यांचा गाडीचा आला (कूलरचे मानकरी), या स्पर्धेत सगळ्या छकडी ड्रायव्हर व बैल जुपणाऱ्या गाडा मालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच अलाउन्सर मान्यवरांना देखील मावळ केसरी अलाउन्सर म्हणून गौरविण्यात आले.
मावळ मुळशी बैलगाडा संघटनेच्या वतीने कान्हे मावळ केसरी घाटाला हिंदकेसरी घाट म्हणून देखील घोषित करण्यात आले. या स्पर्धसाठी महाराष्ट्रातून बैलगाडा मालक, चालक शौकीन उपस्थित होते.





