पिंपरी : ओला-उबेर रिक्षा चालकांनी आता ‘आमचा ऑटो’ चा पर्याय उभा केला आहे. प्रायोगिक तत्वावर याची सुरूवार केली आहे. भविष्यकाळात पाच हजार रिक्षा चालक आणि एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.पिंपरी येथे गुढीपाडव्यानिमित्त नुकतीच रिक्षा चालकांची बैठक पार पडली. या वेळी बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना योग्य, तत्पर सुविधा मिळावी म्हणून आमचा ऑटो. ही सुविधा निर्माण करण्यात आला आहे. यावेळी मेट्रोचे अधिकारी श्री. डॅनियल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे बाळासाहेब ढवळे लक्ष्मण शेलार, शुभम तांदळे, टेक्नॉलॉजी पटणार सूरज प्रताप सिंग, गैवर कुमार सिंग आदी उपस्थित होते. बाबा कांबळे म्हणाले की, केंद्र सरकार सहकारी तत्त्वावर ओला-उबेरसारखा प्लॅटफॉर्म तयार करू पाहत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहोत. सहकारी तत्वावर मोबाईल अॅप निर्मिती करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून यामध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड, पुणे येथील रिक्षा चालकांनी घेतला आहे. लवकरच पुण्यास पिंपरी चिंचवड शहरातील, पाच हजार रिक्षा चालक व एक लाख प्रवासी यांना या योजनेमध्ये जोडले जाणार आहे. यानंतर या अॅपचे अधिकृत उद्घाटन केले जाईल, असे बाबा कांबळे यांनी जाहीर केले. ओला उबेरपासून होणारी लुट थांबणार -आमचा ऑटो यामुळे रिक्षा चालक मालकांना वैयक्तीक फायदा होणार आहे. सध्या ओला उबेर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक-मालकांची लुट करत आहे. कमिशन पोटी मोठी रक्कम वसूल करत आहे. आमचा ऑटो या पमुळे हे थांबणार आहे. तसेच नागरिकांनाही त्वरीत सुविधा मिळणार आहे.