पिंपरी : आठवडाभरात कांदा, लसणाचे दर घसरले

पिंपरी – गेली अनेक महिन्यांपासून दर तेजीत असलेल्या लसणाचे दर गेल्या आठवड्यात उतरले आहेत. तर कांद्याचे देखील दर कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची 4,291 क्विंटल आवक झाली तर पालेभाज्यांची 61,700 गडड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 539 क्विंटल फळभाज्यांची आवक घटली अहे. तर पालेभाज्यांची 1600 गडड्यांनी आवक घटली आहे.
लसणाची किरकोळ बाजारात 300 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. कांद्याची रविवारी दि.5) सर्वाधिक 862 क्विंटल आवक झाली असून, सरासरी 1750 क्विंटल रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात कांद्याची 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याची 697 क्विंटल आवक झाली. त्याखालोखाल टोमॅटोची 609 क्विंटल आक झाली असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 20 ते 30 रुपये राहिला.
थंडीमध्ये मटारची आवक वाढली असून, 420 क्विंटल आवक झालेल्या मटारला 60 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तर गाजराची 216 क्विंटल आवक होऊन 40 रुपये प्रतिकिलो दर मिळाला.कोबीची 428 क्विंटल तर फ्लॉवरची 305 क्विंटल आवक होऊन गडड्याच्या आकारमानानुसार या फळभाज्यांची विक्री होत आहे. वांग्याची 94 क्विंटल आवक झाली असून, किकोळ बाजारात 40न ते 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मिरचीची 136 क्विंटल आवक झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत 19 क्विमटलने घट होऊनही दर स्थिर राहिला. घेवट्याची 76 क्विंटल आवक झाली, तर दोडक्याची अवघी 5 क्विंटल आवक झाली. काकडीची 77 क्विंटल तर कारल्याची 8 क्विंटल आवक झाली.
पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सर्वाधिक 29,200 गडड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथीची 11000 गडड्या, पालक 5100 गडड्या, पुदिना 2900 गडड्या, शेपू 3100 गडड्या, कांदापात 1500 गडड्या, हरभरा 5500 गडड्या, मुळा 2,200 गडड्या तर चवळीच्या 1200 गडड्या आवक झाली. या सर्व पालेभाज्यांची सरासरी 10 रुपये प्रति गडडी विक्री होत आहे.





