तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात आज रविवारी (दि. १२) नगर परिषद कार्यालय सर्वसामान्यांसाठी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली. नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकत्याच प्रभागरचना, आरक्षण आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, हरकती आणि आक्षेप नोंद करण्यासाठी कार्यालय सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे. नागरिकांना आपल्या हरकती आणि आक्षेप नोंदविण्यासाठी कार्यालयात येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.