Pimpari News : जीविका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ताथवडे येथील युवा उद्योजक श्रीकांत नवले यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पिंपरी-चिंचवड ” शहरप्रमुखपदी ” निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे आणि कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. ताथवडे येथील नवले यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत बच्चू कडू यांनी त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भानुदास नवले, माजी सरपंच अनिल इरले, जीविका फाउंडेशनचे सचिव राजू वाघस्कर, सागर पाचर्णे, प्रविण भालेराव, काळूराम नवले, रोहिदास नवले, स्वप्निल फलके, संदीप नवले, प्रविण चौधरी, जितेंद्र पाटील, सर्वेश शिखरे, शंकर नवलकर, सागर पंडित, शफी शेख, आण्णा शिवले, अनिल गाडे आणि लंकेश दळवी यांच्यासह परिसरातील शिवसैनिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवले यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नियुक्ती नंतर नवले यांना शुभेच्छा देताना बच्चू कडू म्हणाले, श्रीकांत सारख्या सामाजिक हितासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या होतकरू तरुणावर शिंदे साहेबांनी या शहराची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची कार्यशैली पाहून ते निश्चितपणे आपली निवड सार्थ ठरवतील असा आम्हास विश्वास आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली महत्त्वाची जबाबदारी ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित सेवा अधिक प्रभावी, तत्पर आणि प्रामाणिकपणे देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. हे पद माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून जनसेवेची मोठी संधी आहे.” श्रीकांत नवले, शहरप्रमुख, वैद्यकीय मदत कक्ष