Pimpari News : चिंचोली येथे संयुक्त जयंती महोत्सव समिती व वंदना कमिटी यांच्या वतीने भारतरत्न व गौतम बुद्धा यांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात (Pimpari News) साजरी करण्यात आली. शनिवारी भीमज्योत, पंचशील ध्वजारोहण व वंदनेचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी (Pimpari News) भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. रविवारी चिंचोली बुद्ध विहाराचे नामकरण “विश्व शांती बुद्ध विहार” असे भन्ते महाबोधी आर्याजी (भिक्षुणी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर अन्नदान, बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम तसेच ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात (Pimpari News) करण्यात आला.