पिंपरी : दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार

पिंपरी – टॉवरलाईन परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी चौघांनी दोन मित्रांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना 1 मे रोजी कृष्णानगर येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी यशपाल गौतम सरवदे (वय-23, रा. भालेकर चाळ, त्रिवेणीनगर, निगडी) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार भंडारी, योगेश लहाणे, गणेश तोरसकर, पवन लष्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशपाल हा बुधवारी रात्री कृष्णानगर येथे बसला होता. यावेळी आलेल्या आरोपींनी टॉवरलाईन मधील तुझे मित्र कुठे आहेत, असे विचारले असता त्याने माहीत नाही असे सांगितले. आरोपींनी यशपालला मारून टाकू म्हणजे आपली टॉवरलाईन परिसरात दहशत बसेल, असे म्हणून त्याच्यावर कोयत्याने डोक्‍यात वार केले. तसेच आईस्क्रीमच्या हातगाडीवरील तीन ते चार काचेचे ग्लास डोक्‍यात मारले. यशपालचा मित्र रोहित पोपट गोफणे याच्यावरही कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार बागुल हे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.