पिंपरी – तिघेजण कामगाराला बेदम मारत असल्याचे पाहून कामगाराला वाचवायला गेलेल्या मालकाही तिघांनी दगडानी मारहाण केली. तसेच तुमची दोघांची विकेट टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना 21 एप्रिल रोजी फुगेवाडी येथे घडली. याप्रकरणी स्वप्निल सुरेश फुगे (वय-32, रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षय फुगे, उमेश फुगे, संभाजी फुगे (रा. फुगेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुगे यांच्याकडे सालीक नावाचा तरूण कामाला आहे. त्याला आरोपी मारहाण करत होते. यावेळी, सोडविण्यासाठी गेलेल्या स्वप्निल फुगे यांना देखील आरोपींनी दगडाने मारहाण केली. तसेच तुमची विकेट टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी देऊन पळून गेले. या प्रकरणाबाबत अधिक तपास फौजदार काबुगडे करत आहेत.