पिंपरी : किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

पिंपरी – रस्ता क्रॉस करीत असताना झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी मिळून एकाला दगडाने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.30) रोजी दुपारी बाराच्या सुमारास वाकड येथे घडली. या प्रकरणी राहुल बाळासाहेब भुजबळ (वय 34, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भुजबळ हे रस्ता ओलांडत असताना आरोपींनी “तुला रस्ता क्रॉस करता येत नाही का’ असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भुजबळ यांनी याचा जाब विचारला असता त्यांना दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.