पिंपरी -शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील सामान व रोख रक्कम असा 7 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे नुकतीच उघडकीस आली.
या प्रकरणी रवींद्र हनुमंत कुरवडे (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवींद्र यांचे वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकामध्ये पतंजली स्टोअर आहे. चोरट्यांनी अज्ञात साहित्याच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानातील सामान व रोख रक्कम असा 7 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहे.