Pimpri : ओला सुका हा कचरा विलगीकरण करू या!

पथनाट्य करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. ओला सुका हा कचरा, विलगीकरणं करू या! पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या! असे म्हणत महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीसमोर पथनाट्याला सुरुवात झाली…
पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे आणि महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत डॉ. पी. एस. आगरवाल यांनी सहभाग घेतला होता.
अण्णा जोगदंड म्हणाले.. ” काचा, ब्लेड, धारदार वस्तू या कचऱ्यात टाकू नयेत. तर ते स्वतंत्र घंटागाडीतील सेवकांच्या हातात द्यावे. त्याच कचऱ्याच्या गाडीवर एक महिला सफाई कामगार बसलेली असते याचा विचार करावा.महात्मा गांधी झालेले डॉक्टर पी एस आगरवाल म्हणाले शरीराच्या स्वच्छतेबरोबर माणसाच्या मनाची स्वच्छता आजच्या काळात होणे आधिक गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. उपायुक्त सचिन पवार म्हणाले, घातक कचरा, सुका, ओला कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करावे काही नागरी समस्या असतील तर जरूर सांगावे.”आम्ही सर्वजन मदत करण्यास तयार आहोत.
यावेळी मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार ,ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, आरोग्य निरीक्षक स्नेहल कांबळे, रश्मी तुंडलवार, शंकर घाटे व इतर कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. महिला कर्मचारी गंगुबाई अलजेंडे यांचा सत्कार करण्यात आला. आभार सुखदेव लोखंडे यांनी मानले. महात्मा गांधी यांना समर्पित आदरांजली आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.





