Pimpri | वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत सापडले मृत अर्भक
Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी / Pimpri News ) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालाच्या कचराकुंडीमध्ये काही दिवसांचे जन्मलेले स्त्री जातीचे मृत अर्भक शनिवारी (दि.27) सकाळी आढळले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक महिला हॉस्पिटलच्या मागील प्रवेशद्वाराने परिसरात आली. तिने हे अर्भक कचराकुंडीत टाकले व पळून गेली.
ती वायसीएममध्ये उपचार घेत नसल्याचेही उघडकीस आले आहे. अर्भक हे काही दिवसांचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवेश निषिद्ध असलेल्या ठिकाणी कोणीही कचरा टाकून जात असल्याने वायसीएम रुग्णालयाची सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ( Pimpri News )
ही बाब पोलिसांना कळविण्यात आली असून, पोलीस ( Pimpri Police ) या महिलेचा शोध घेत आहेत.





