Pimpri : चिंचवडमधील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

पिंपरी : महिला वर्गासाठी पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून ब क्षेत्रीय कार्यालयाजवळ उभारलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण शनिवारी (दि. ८) आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, अपर्णा डोके, ॲड. मोरश्वर शेडगे, अभिषेक बारणे, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता सोनवणे, सहायक अभियंता प्रवीण धुमाळ, कनिष्ठ अभियंता शेमले, सवासे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने उभारण्यात आलेल्या या पाण्याच्या टाकीमुळे चिंचवडगावातील प्रामुख्याने तानाजीनगर, केशवनगर या भागात बायपासमुळे कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा ही समस्या समाप्त झाली आहे. तसेच या अतिरिक्त पाण्याच्या टाकीतून चिंचवडगावठाण, माणिक कॉलनी, श्रीधरनगर, सुदर्शननगर, गावडे कॉलनी याभागातही पाणी पुरवठा होणार असल्याने या भागासही लाभ होणार आहे.
तानाजीनगर, केशवनगर भागास बायपासमधून पाणी द्यावे लागत असल्याने पिंपरी, सांगवी, पिंपळे गुरव या भागात होणार पाणीपुरवठा पूर्ण क्षमते इतका होत नव्हता. त्या भागातही आता पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे.





