रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल २७ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर खालापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना २७ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ३०) आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या सर्व रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत माडप ते माडप ठाकूरवाडी, आपटी ते झाडाणी, दूरशेत कातरवाडी-बोरमाल, तलाशी ढेबेवाडी, उजलोली आदी रस्त्यांची कामे होणार आहेत. या वेळी आमदार थोरवे यांनी, खालापूर तालुक्यातील आदिवासी वाड्या, दुर्गम भागातील रस्ते हे विकासाचे मुख्य साधन आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक भागांचा विकास थांबला होता. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मोठा निधी मिळाल्याने विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याची माहिती दिली. प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, कर्जत – खालापूर विधानसभा युवा सेना अधिकारी रोहित विचारे, विनोद साबळे, माजी पं.स. सदस्य उत्तम परबळकर, भाई शिंदे, माजी सरपंच शैलेश मोरे, सरपंच महेश पाटील, उपजिल्हा युवासेना अधिकारी निखिल पाटील, शशिकांत मोरे, अँड.जयेश तावडे, अँड.भगवान लाले, सुशांत विचारे, पांडुरंग पाटील, सागर भुईकोट, सागर पाटील, राजन पाटील, बबलू मोरे, शशि विचारे, विलास मोरे, अंकुश मोरे, एम.डी चालके, जितेंद्र सकपाळ, विलास थोरवे, सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.