Pimpri : ट्रेडिंगच्या नावाखाली पावणे तीन लाखांची फसवणूक
Updated On:

पिंपरी : ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली एका चोरट्याने दोन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत शिंदेवस्ती, नेरे गाव येथे घडली.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने सोमवारी (दि. ३) याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्या आनंद नावाचा व्यक्ती, तीन मोबाइल क्रमांक धारक आणि चार बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये जाॅइन केले. त्यांना ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल असे सांगितले.
एक अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यात सांगत त्यांच्याकडून दोन लाख ८० हजार ४३२ रुपये घेत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.





