Pimpri : लोणावळ्यातील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

लोणावळा : लोणावळा शहरातील अनेक माजी नगरसेवक – नगरसेविका आणि इतर पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या सर्वांना पक्षात मान, सन्मान दिला जाईल. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. त्यादृष्टीने शिवसेना कामाला लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार आहे.





