पिंपरी : दुकानदारावर कारवाई न करण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील महिला पोलिसाने एक हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी एसीबी पोलीस महिलेला पळून जात असताना पाठलाग करून पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. ५) केली. रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे अटक केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदाराची भोसरी येथे डेअरी आहे. त्यांनी ३१ मार्च रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवले. याप्रकरणी महिला पोलीस रेश्मा नाईकरे यांनी डेअरी चालकाला भोसरी पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर खटला भरला होता. कारवाई न करण्यासाठी नाईकरे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. एसीबीने भोसरी पोलीस ठाण्यात सापळा लावून करून एक हजारांची लाच घेतली. एसीबीची कुणकुण लागताच तिने ठाण्यातून पळ काढला. त्यानंतर पिंपरी न्यायालयाच्या समोर पाठलाग करून पकडण्यात आले. नाईकरे हिच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाइल फोन जप्त केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.