पिंपरी : भटक्या श्वानाला लाकडे दांडक्याने व दगडाने मारहाण करून जिवे मारले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी येथे रविवारी (दि. १३) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. सतिश जडकर (रा. क्रांतीवीर कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) आणि त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गुरूनानकनगर, पुणे येथे राहणार्या एका ६७ वर्षीय महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी सतिश जडकर आणि त्याच्या मित्राने एका भटक्या श्वानास लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. यामध्ये पाच ते सहा वर्षाचे श्वान मृत्यूमुखी पडले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.