प्रभात वृत्तसेवा पिंपरी – क्रिप्टो करन्सीमध्ये ३०० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची १३ लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घअना १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली आहे.रोहन देशमुख व इतर अज्ञात बँक खाते धारक आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बापूजी वाघ (वय ३६, रा. पार्क कनेक्ट सोसायटी, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. १६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामवरील VIP ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादी अक्षय यांना ३०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला. तसेच अक्षय यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर१३ लाख ४१ हजार रुपये भरायला लावण्यात आले. पैसे परत मागितल्यावर आणखी सात लाख रुपयांच्या रक्कमेची मागणी करण्यात आली. फिर्यादी अक्षय यांनी नफयातून रक्कम वजा करून घ्या असे सांगितल्यावर तसे करण्यास नकार देत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.