प्रभात वृत्तसेवा पिंपरी – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घसटना गुरुवारी (दि. ६) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर, चिंचवड येथे घडली.छैया पातरे, करण दोढे (दोघेही रा. विद्यानगर, चिंचवड) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अजय देवप्पा हेळवाळ (वय १७, रा. एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकर नगर, दत्तनगर, चिंचवड) असे जखमी अल्पवयीन मुलाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास टाटा शोरुमसमोर, दत्तनगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी आपल्या मित्रासह मोपेडवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने त्यांच्या पायावर आणि कमरेवर वार केला. त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सीमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.