प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणास तीन जणांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ३०) दुपारी एक वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे घडली.विकी बाळासाहेब ढमाले (वय ३८), आयुष शरद ढमाले (वय १९) आणि विकी याचे वडील बाळासाहेब ढमाले (सर्व रा. भैरवनाथ मंदिरासमोर, बेबड ओहोळ, ता. मावळ, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजीव कुमार कृष्णमोहन ठाकुर (वय २५, रा. बेवड ओहोळ, ता. मावळ, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. ३०) याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपी याच्या घरी जाऊन त्यांच्याकडे कामाचे पैसे मागितले. यामुळै आरोपी संतापलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी राजीवकुमार ठाकुर यांना लाकडी काठीने व हाताने मारहाण करून फिर्यादीला गंभीर दुखापत केली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.