Pimpri : ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर पलटी
Updated On:

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ४५.४०० येथे मुंबई मार्गिकेवर ब्रेक फेल झाल्याने एक कंटेनर पलटी झाला. गुरुवारी हा अपघात घडला. यात कंटेनर चालक जखमी झाला आहे. द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाखाली हा अपघात झाला.
अपघातग्रस्त कंटेनर (क्रमांक जीजे १८ बीव्ही १३८७) वरील चालक मोहम्मद कैफ (वय २२ वर्ष, रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) हा यात जखमी झाला. पुणेहून मुंबईच्या दिशेने जात असताना अमृतांजन पुलाखाली तीव्र उतार व वळणाच्या ठिकाणी वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर पलटी झाला.
आयआरबी, महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट यांनी तातडीने मदतकार्य करून जखमीस उपचारासाठी रुग्णालयात पाठविले व कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.





