पिंपरी – 9 व्या दक्षिण आशियाई यूथ गेम्स 2023 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील कोया फिटनेस ऍकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले. सुवर्ण, कास्य आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरत शहराच्या नावलौकिकात भर घातली. केलियानी, कोलम्बो, श्रीलंका येथे या स्पर्धा पार पडल्या.
योगासनांच्या स्पर्धेत भारत, नेपाळ व श्रीलंका या तीन देशांच्या 118 स्पर्धकांनी भाग घेतला. अभिश्री राजपूत यांनी या स्पर्धेत पंच आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावली. खेळाडूंनी पाच गटामधील एकूण पदकांपैकी 16 पदके पटकावली.
6 ते 12 मुलींच्या गटात काश्वी गायकवाड़ , ऋजुल जोशी, त्विशा सोहनी, त्रिशा बंसल, आरोही राउत, मनवा पंडित यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा आणि सहावा क्रमांक प्राप्त झाला. 13 ते 20 मुलींच्या वयोगटात सानिका ब्रह्मे, आरगडे तस्मी, आर्या जाधव, निहारिका गद्रे, अनुष्का रानडे अनुक्रमे प्रथम, द्वीतीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा क्रमांक प्राप्त झाला.