Pimpri Chinchwad Police – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत प्रशासकीय फेरबदल करत तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे पिंपरी, वाकड आणि नियंत्रण कक्षातील कामकाजात नव्याने जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची पिंपरी पोलीस ठाण्यातून वाकड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली मुंडकर यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांना तेथे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारक व सुरळीत करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.