Pimpri-Chinchwad | निवडणूक खर्चाबाबत निरीक्षक प्रकाश मीना यांच्या उमेदवारांना सूचना…
Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सर्व संबंधित उमेदवारांची आचारसंहिता व निवडणूक खर्च विषयक बाबी संदर्भात बैठक घेतली.
या बैठकीत सर्व उमेदवारांना त्याबाबतचे विहित नियमांची माहिती करून दिली. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक प्रकाश मीना हे उपस्थित होते.
प्रकाश मीना यांनी सर्व संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च विषयक बाबी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारांच्या शंकाचे माहिती देवून निरसन केले. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, नागु वाकसे, नायब तहसीलदार अभिजीत केंद्रेकर, निवडणूक खर्च नोडल अधिकारी माधुरी बांदल, मिडिया नोडल विजय भोजने उपस्थित होते.




