पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी ‘नोटा’ पर्यायाचा होतोय प्रचार

पिंपरी – लोकसभा निवडणूक जस-जशी जवळ येत आहे. तेवढ्याच जोमाने राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. आतापर्यंत कधीही “नोटा’चा प्रचार कोणीच केला नव्हता. मात्र यावेळी पॅनकार्ड क्‍लब कंपनी बंद झाल्याने देशातील 55 लाख गुंतवणुकदारांची आर्थिक कोंडी सोडवण्यात अयशस्वी ठरलेल्या सत्ताधारी सरकार व विरोधीपक्ष प्रतिनिधींना नोटाच्या मार्फत धडा शिकवण्याचा निर्धार राष्ट्रशक्ती को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. या कमिटीने सत्ताधारी आणि विरोधकांसाठी मतदारांनी “नोटा’चा पर्याय निवडवा यासाठी प्रचारात उडी घेतली आहे.

सतरा वर्ष काम केल्यावर सीआयएस नियमात बसत नसल्याचे कारण देत पॅनकार्ड कंपनी बंद करण्यात आल्याने देशभरातील 55 लाख गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. यातील 35 लाख गुंतवणूकदार हे महाराष्ट्रातील आहेत. सॅट कोर्टाने निकाल देवूनही सरकार व विरोधी पक्षांकडून हा प्रश्‍न मार्गी लावला जात नसल्याने व्यथीत होवून पॅनकार्ड क्‍लब बाधितांनी नोटा या पर्यायाचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघात याचा प्रचार केला जाणार असून 35 लाख गुंतवणूकदार एकत्रीत येवून नोटा या मतदान पर्यायाचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि.31) सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रशक्ती को-ऑर्डिनेशन कमिटीच्या सदस्यांनी कसा प्रचार व प्रसार करायचा याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी जमलेल्या सर्व सदस्यांना एस.एल. साळवी, आर. एल. साळवी, मुकूटराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. या मोहीमेतून 30 ते 40 टक्के मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या नागरिकांचे आपण नेतृत्व करणार असून नोटा मार्फत लोकप्रतिनिधीवर दबाव आणला जाणार आहे. नागरिकांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यामाध्यमातून चपराक देण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.