पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर येथील कपड्याच्या दुकानाला आग; मोठे आर्थिक नुकसान
Updated On:

पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर परिसरातील शिवार गार्डनजवळ सोमवारी रात्री भीषण आग लागली. २ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला आग लागली. त्यामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली.
या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून स्थानिक पोलीसही बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले. दरम्यान, आगीत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





