पिंपरी चिंचवड: नरक चतुर्दशीला फटाक्यांमुळे आठ ठिकाणी आग

पिंपरी – नरक चतुर्दशीच्या दिवशी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या आठ घटना शहराच्या विविध भागात घडल्या. अग्नीशामक दलाला याबाबत वर्दी मिळताच अग्नीशमक बंब घटना दाखल होत आग विझविण्यात आली. या घटना सायकांळी ४ ते रात्री १२ बाराच्या दरम्यान घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
दिवाळीनिमित्त फटाके फोडण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. त्यामुळे सर्वत्रच फटाके फोडले जातात. मात्र, फटाके फोडताना काळजी न घेतल्यास दुर्दैवी घटना घडत असतात. गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी ४ ते रात्री १२ या आठ तासादरम्यान पिंपरी चिंचवड अग्नीशामक नियंत्रण कक्षास १० कॉल प्राप्त झाले. त्यापैकी ८ आगीच्या घटना फटाक्यांमुळे झाल्या असल्याचे अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणी लागली आग
फुगेवाडीतील कुंदननगर, आळंदीतील नानाश्री मंगल कार्यालयाजवळ, नवी सांगवीतील कृष्णा चौक, कासारवाडीतील सरिता संगम सोसायटी, वाकडमधील पार्क स्ट्रिट सोसायटी, चिंचवड येथील एम्पायर स्वेअर सोसायटी, वडमुखवाडीतील जेजीसी सोसायटी, वाकड कस्पटे-वस्ती येथील निसर्ग दीप सोसायटी, तसेच नंददीप सोसायटी, पिंपळे सोदागर येथील निसर्ग मान सोसायटी आदी ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.





