पिंपरी-चिंचवड : इंग्लंडहुन आलेला युवक करोना “पॉझिटिव्ह’; भोसरी रुग्णलयात उपचार सुरू
Updated On:

पिंपरी – इंग्लंड या देशामध्ये करोनाच्या नवीन विषाणूचा उद्रेक झाला आहे. या देशातून दहा दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या एका युवकाला या विषाणूची लागण झाली आहे.
इंग्लंडमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. तेथील करोना विषाणूच्या जणुकीय रचनेमध्ये काही बदल आढळून आले आहेत. तसेच हा विषाणू आताच्या करोना विषाणूच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे.
या देशामधून आतापर्यंत शहरामध्ये 135 नागरिक आले आहेत. त्यापैकी 85 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यामधील 70 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तर एका 35 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अद्याप 15 प्रवाशांचे अहवाल येणे बाकी आहेत.





