Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना सध्या फुलांचा बहर आलाय. वसंत ऋतू मध्ये या वृक्षांना फुलांचा बहर येत असतो. शहरातील रावेत, निगडी प्राधिकरण परिसरात असलेली बहवा, चेरी ब्लॉसम, विविध रंगी बाऊनाईंविल्ला, ब्लूमिंग येल्लो आदी वृक्षांची फुले सध्या वाटसरुंना आपल्याकडे आकर्षित करत आहे. रखरखत्या उन्हात ही रस्त्यावरून जाताना वाटसरुंना प्रदेशातील रस्त्यावरुन फिरत असल्याचाच भास होतो. सध्या अनेकांंना या गुलाबी फुलांची भुरळ पडली आहे. Pimpri Chinchwad